
ॲड. जयश्री शेळके
ॲड. जयश्री सुनिल शेळके या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्या आहेत. त्या शिवसेनेच्या सक्रिय कार्यकर्त्या असून त्यांनी २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून बुलढाणा- मोताळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. त्या बुलढाणा जि.प च्या माजी सदस्या राहिलेल्या आहेत. साखळी बु. जिल्हा परिषद गटाच्या सदस्य पदावर असताना त्यांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन नागरी विकासाचे अनेक प्रश्न सोडवले.
उत्कृष्ट वक्त्या असलेल्या जयश्रीताई शेळके या विधी अभ्यासक्रमाच्या पदवीधर आहेत. त्या ‘दिशा महिला बचत गट फेडरेशन’च्या त्या संस्थापक अध्यक्षा असून आजवर जिल्ह्यातील शेकडो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात विविध विकास कार्यातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली असून कर्तव्यनिष्ठ, बहुआयामी नेतृत्व म्हणून जयश्रीताई शेळके यांनी जनसामान्यात अढळ स्थान निर्माण केले आहे.”
