Main Banner

ॲड. जयश्री शेळके

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलांच्या यादीत अग्रगण्य नाव म्हणजेच मा. जयश्रीताई शेळके. सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी सहकार, महिला सक्षमीकरण, बचतगट, कृषी, उद्योग, राजकारण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना केली. दिशा अर्बन पतसंस्थेची स्थापना करून महिलांना भांडवल उपलब्ध करून दिले, तसेच अनेकांना रोजगार मिळवून दिला. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी धडाडीने मदतकार्य केले. `दिशा हेल्पलाईन`द्वारे अनेक रुग्णांना उपचार, औषधी, जेवण, अन्नधान्य किट या स्वरूपात मदत पुरवली.

मा. जयश्रीताई शेळके सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव आहेत. साखळी बु. जिल्हा परिषद सर्कल सदस्य म्हणून कार्य करीत असताना त्यांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन नागरी विकासाचे अनेक प्रश्न सोडवले. उत्कृष्ट वक्त्या असलेल्या जयश्रीताईंना परिसरात लोकप्रिय लोकनेत्या म्हणून ओळखण्यात येते. काँग्रेस पक्षात विविध पदांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. कर्तव्यनिष्ठ आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून जयश्रीताई शेळके यांनी जनतेत अढळ स्थान निर्माण केले आहे.

Previous slide
Next slide

मुख्यक्षेत्र

गॅलरी

मदत व माहितीसाठी संपर्क

मदतीसाठी संपर्क :

माहितीसाठी मेल :

    ताज्या घडामोडी

    ताईंना भेटला आहात ? सोबतचा फोटो शेयर करा