दिशा फेडरेशनच्या दोन दिवसीय महिला बचतगट प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी लावली हजेरी !

Jayshree Shelke, best politician in buldhana, Top politician in buldhana, leading politician in buldhana, Congress leader in buldhana, Buldhana Politics

दिशा बुलढाणा जिल्हा महिला फेडरेशनतर्फे आणि जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय महिला बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त बचत गटाला उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, महिलांनी मेहनतीने बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांची ओळख सर्वांना व्हावी या प्रमुख उद्देशाने जयश्रीताई शेळके यांनी बुलढाण्यात दोन दिवसीय वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. आठवड्याच्या शेवट असल्याने बरेच लोक प्रदर्शनाला भेट देतील ही त्यांची दुरदृष्टी यशस्वी ठरली. शनिवार आणि रविवारी या प्रदर्शनामुळे बुलढाण्याला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनतर्फे हे आयोजन कौतुकास्पद ठरले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जयश्रीताई शेळके यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याची प्रचिती प्रदर्शनाला मिळालेल्याला प्रतिसादातून दिसली. जयश्रीताई यांनी वारंवार महिलांच्या बैठका घेऊन त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवला, त्यांच्या उत्पादनाची मार्केटिंग कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केल्यानेच १३५ पेक्षा जास्त स्टॉल प्रदर्शनात लावल्या गेले. या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळावा, महिलांची प्रगती व्हावी यासाठी त्या गेल्या २ महिन्यापासून धडपडत होत्या. या ५० ते ६० दिवसात जयश्रीताई यांनी १८० पेक्षा जास्त गावाला भेट दिली. तेथील महिलांशी चर्चा केली, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या, विविध कल्पना समजून घेत त्यांना योग्य मार्ग सुचवले.

सर्व सोयींयुक्त भव्य मंडप

प्रदर्शनात भव्य मंडपसह, स्टॉलधारकांसाठी सुटसुटीत स्टॉल उपलब्ध होते. सार्वजनिक अंतर असावे यासाठी प्रत्येक स्टॉलसमोर मोकळी जागा ठेवली होती. स्वच्छतेची काळजी घेतली जावी म्हणून जागोजागी डस्टबिन, पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे जार लावले होते. मोठे मंडप, प्रकाश योजनेची पूर्ण व्यवस्था असल्याने उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंटची प्रचिती झाली. जागोजागी पंख्याची व्यवस्था, कोणती वस्तू कुठे मिळेल यासंदर्भात लावलेले फलक याची पूर्ण काळजी जयश्रीताई यांनी घेतली. त्यामुळेच या प्रदर्शनाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात २० हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी हजेरी लावली.

चहा मसाल्यापासून ते पाय पुसणी पर्यंतचे होते स्टॉल

महिलांनी तयार केलेले अनेक वस्तू प्रदर्शनात पाहावयास मिळाले. चहा मसाला, मटण मसाला, भाजी मसाला, आकाशकंदील, आकर्षक दिवे, रांगोळीचे विविध ऑरगॅनिक रंग, रांगोळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, फॅशनेबल कपडे, मसाज करणारे यंत्र, फराळाचे सर्व प्रकार, फराळ तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, घर सजावटीचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने, उबटन, अगरबत्ती, ग्रामीण भागातील गावरान तूप, भेसळमुक्त तेल आणि सर्वांचे आवडते खाद्य स्टॉल. ज्यामध्ये मटण मांडा सर्वांची पसंती घेत होता. पिठले भाकर यासह इतर खाद्यपदार्थ खाण्यासाठी नागरिक गर्दी करत होते.

हजारो महिलांना रोजगार

ऐन दिवाळीच्या काळात शेकडो महिलांच्या हाताला काम मिळाल्याने त्यांना आर्थिक बळ मिळाले. आपण हि काही तरी करू शकतो हि भावना त्यांच्यात निर्माण झाली. यापुढे परत असे आयोजन करावे अशी इच्छा येथील महिलांनी जयश्रीताई यांच्याकडे केली. प्रदर्शनामुळे हजारो लोकांशी बोलण्याची कला अवगत झाल्याने अल्प शिक्षित महिलांमध्येही व्यक्तिमत्व विकास झाल्याचे दिसून आले. हे केवळ एका आमच्या लाडक्या ताईंची संकल्पना, त्यांची महिला विकासासाठीची धडपड आणि संकल्पनेच्या अमलबजावणीमुळेच शक्य झाले.

नोकरदार महिलांना मिळाला घरासारखा फराळ

प्रदर्शनात महिलांनी घरी केलेल्याच वस्तू उपलब्ध झाल्याने ज्या नोकरदार महिला आहे त्यांनी या वस्तुंना पसंती दिली. बरेच जण तेथे हे फराळ खरेदी करून परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाठवणार असल्याच्या चर्चाही होत्या. घरी केलेल्या वस्तूची प्रचंड मागणी असते याची जाण जयश्रीताई यांना असल्याने हे घडले.

खरेदीचा आनंद अन स्नेहमेळावा

प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासोबत, मैत्रिणीचा ग्रुप, मित्राचा ग्रुप, शालेय विद्यार्थ्यांचा ग्रुप भेट देत होते. खरेदीचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावरूनच पाहायला मिळाले. एकमेकांना नातेवाईक प्रदर्शनात भेट देत आपण खरेदी केलेल्या वस्तू दाखवताना दिसले. त्यामुळे स्नेहमेळावा सुरु कि काय असेच वाटले.
शेकडोना काम, हजारो ग्राहक आणि लाखोंची उलाढाल
काही शुल्लक वस्तू तयार करणाऱ्या महिला उद्योजकांची एवढी डिमांड आहे, हे पाहून महिला उद्योजिका भारावल्या होत्या. त्यांच्या सुप्त गुणांना जयश्रीताई यांनी ओळखल्याने १३५ पेक्षा जास्त स्टॉल मधील शेकडो महिलांनी २० ते ५० हजारापर्यंत व्यायसाय केला. या दोन दिवसात या महिलांनी लाखोंची उलाढाल केली हे कौतुकास्पद आहे.

Leave A Comment