Inauguration of virtual classrooms, laboratories and e-learning classes in Zilla Parishad Marathi primary schools

  • Home
  • Education
  • Inauguration of virtual classrooms, laboratories and e-learning classes in Zilla Parishad Marathi primary schools
education

जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील व्हर्च्युअल क्लासरुम, प्रयोशाळा व ई-लर्निंग वर्गांचे उद्घाटन 

येळगाव ता. बुलडाणा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील व्हर्च्युअल क्लासरुम, प्रयोगशाळा व ई-लर्निंग वर्गांचे उद्घाटन काल १३ मार्च रोजी संपन्न झाले. जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतच्या व स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेचे रूप पालटले आहे! नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता स्पर्धेत मागे राहणार नाही. या बदलासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन💐 आणि आभार🙏🏻