काँग्रेसच्या भव्य न्याय यात्रेद्वारे सर्व भारतवासीयांना मिळेल न्याय !

  • Home
  • Education
  • काँग्रेसच्या भव्य न्याय यात्रेद्वारे सर्व भारतवासीयांना मिळेल न्याय !

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला रविवारपासून (ता. १४ जानेवारी) मणिपूरमधील खोमजोम (जि. ठुबई) येथून प्रारंभ झाला आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा देशभरात ६७१३ किमी बसने आणि पायी प्रवास करेल. ही यात्रा ६६ दिवस चालणार असून, ११० जिल्हे, १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. येत्या २० किंवा २१ मार्च २०२४ रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच राहुल गांधी हे थेट पुन्हा जनतेच्या दारात जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या यात्रेतून काँग्रेसने कंबर कसल्याचे दिसून येते. भारतीय जनतेचे बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि सामाजिक न्याय हे मुद्दे लावून धरण्यात येतील. राहुल गांधी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्रेचा पंधरा राज्यांतून प्रवास होईल. शंभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतील.


* भारत न्याय यात्रा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. राहुल गांधी यांनी आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू केली आहे. मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार आहे. भारतवासीयांना न्याय देण्यासाठी या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव दिले आहे. ही यात्रा ईशान्येतील मणिपूरपासून सुरू होऊन देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मुंबईत जाणार आहे.

* विकासाची खरी यात्रा

काँग्रेसची ही यात्रा १४ जानेवारी रोजी मणिपूरची राजधानी इम्फाळमधून सुरू झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी या यात्रेदरम्यान सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायावर भाष्य करणार आहेत आणि देशातली खरी परिस्थिती जाणून घेणार आहेत. तब्बल ६ हजार ७०० किमी लांब ही पदयात्रा देशातील १५ राज्यांमधून जाईल. राहुल गांधी तब्बल ६७ दिवस ६ हजार ७१३ किमी प्रवास करतील. १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल. या यात्रेत तब्बल १०० लोकसभा मतदारसंघांना ते भेट देतील. ही यात्रा मुंबईत समाप्त होईल. यात्रेच्या ६७०० किमीपैकी ११०० किमी प्रवास एकट्या उत्तर प्रदेशमध्ये असेल.

* या राज्यांतून जाईल न्याय यात्रा

काँग्रेसची ही न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा १५ राज्यांचा प्रवास करेल.

* काँग्रेसची न्याय योजना काय आहे?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीरनाम्यात सादर केलेली न्याय योजना काँग्रेस पक्ष पुढे नेणार आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही न्याय योजना काँग्रेसने आणली होती. याअंतर्गत ज्या कुटुंबाचे दरमहा उत्पन्न १२,००० पेक्षा कमी आहे अशा देशातील २५ कोटी लोकांना या न्याय योजनेद्वारे लाभ मिळेल.

* सर्व स्तरांतून मिळतोय प्रतिसाद

जातीय हिंसाचाराने मणिपूर धगधगते आहे. मणिपूरमधील जातीय हिंसाचार थांबलेला नाही. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही या राज्याचा दौरा केला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रेची मणिपूरमधून सुरुवात केली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराबद्द्ल सर्व स्तरातून रोष व्यक्त होत आहे. अशावेळी राहुल गांधी यांच्या या न्याय यात्रेला सर्वस्तरातील देशवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Comment