महागाई, बेरोजगारीतून मुक्ततेसाठी काँग्रेसची ‘डोनेट फॉर देश’ मोहीम

  • Home
  • Education
  • महागाई, बेरोजगारीतून मुक्ततेसाठी काँग्रेसची ‘डोनेट फॉर देश’ मोहीम

भारतीय जनतेला महागाई, आर्थिक दुर्बलता, बेरोजगारीच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने ऑनलाइन क्राउड फंडिंगद्वारे ‘डोनेट फॉर देश’ ही देशव्यापी सामाजिक मोहीम सुरु केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात जनतेने अनेक अन्याय सहन केले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकाचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. बेरोजगारीमुळे युवकांच्या हाताला काम नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भारतीय समाजात जातीय द्वेष पसरवला जातोय. यातून सर्वसामान्य भारतीयांना मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षाने `डोनेट फॉर देश’ या मोहिमेद्वारे ऑनलाइन क्राउड फंडिंग सुरु केली आहे. ज्याप्रकारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज्य फंडातून स्वदेशी वस्तूंचा वापर आणि दारूबंदीचा संकल्प पूर्ण केला होता, तशाच पद्धतीने आता भारतवासीयांना बेरोजगारी, महागाई, जातीय द्वेष यातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे.

* २ लाख भारतीयांचा सहभाग

काँग्रेस पक्षाच्या ‘डोनेट फॉर देश’ या देशव्यापी सामाजिक मोहिमेत भारतीय नागरिक लाखोंच्या संख्येने सहभागी होत आहेत. यामध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे भारतीय नागरिक एका खास डिझाईन केलेल्या वेबसाइटद्वारे काँग्रेस पक्षाला १३८ रुपये, १३८० रुपये १३,८०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देऊ शकतात. सर्वसामान्य जनतेची मदत घेऊन देशाच्या उभारणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. ‘डोनेट फॉर देश’ या देशव्यापी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम जनकल्याणासाठी वापरण्यात येणार आहे. देशभरातील सुमारे दोन लाख नागरिकांनी काँग्रेसला प्रतिसाद देत या मोहिमेत सहभाग दर्शवला आहे. याशिवाय या मोहिमेतून आणखीही मोठ्या संख्येने नागरिक काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी मोहिमेत सामील होत आहेत.

* असा होता टिळक स्वराज्य फंड !

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांच्या नावाने टिळक स्वराज्य फंड निर्माण केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. किंबहुना हा आधुनिक भारतातला सर्वात पहिला सीएसआर फंड आहे. यामुळे असंख्य ज्ञात-अज्ञात हातांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सढळ हाताने मदत केल्याचे आढळते. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहतानाच महात्मा गांधी यांनी ही संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला अखंड हिंदुस्थानातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी समर्थन देऊन आपले योगदान दिले. याद्वारे तब्बल १ कोटी रुपयांचा फंड जमवण्याचा संकल्प महात्मा गांधींनी केला होता. या निधीतून स्वदेशी चळवळ आणि दारूबंदी यासारख्या मोहिमांना आर्थिक बळ देण्याचा महात्मा गांधी यांचा मानस होता. समस्त भारतीयांच्या मदतीने गांधीजींनी आपला हा संकल्प पूर्ण केला.

Leave A Comment